Virat Kohli In Ranji Trophy : जवळपास 13 वर्षांनी भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) रणजी ट्रॉफी सामने खेळण्यासाठी उतरला आहे. गुरुवार पासून अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यात रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) सामना खेळवला जात असून यात विराट दिल्ली संघाकडून खेळत आहे. विराटला खेळताना पाहण्यासाठी त्याचे फॅन्स हजारोंच्या संख्येने स्टेडियमवर उपस्थित होते. दरम्यान दिल्लीत रणजी सामना खेळायला आलेल्या फिटनेस फ्रिक विराटने दुपारच्या जेवणात एका विशेष चायनीज पदार्थाची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. ज्याबाबत शेफ शेफ संजय झा यांनी एका मुलाखतीत सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत रणजी ट्रॉफी सामना खेळायला आलेल्या विराट कोहलीने अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणात पनीर चिलीची मागणी केली. शेफने सांगितले की यापूर्वी विराट स्टेडियमच्या कँटीनमध्ये नेहमी चिकन चिल्लीची ऑर्डर द्यायचा. परंतु 2018 मध्ये कोहलीने आरोग्याकडे लक्ष देत मांसाहार सोडला आणि तो पूर्णपणे शाकाहारी वेगन झाला. त्यामुळे यावेळी दिल्लीत सामना खेळण्यासाठी आलेल्या कोहलीने चिकन चिल्ली सोडून पनीर चिल्लीची ऑर्डर केली. 


संघातील खेळाडूंसोबत घेतला कढी भाताचा आनंद : 


दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की कोहलीने सामन्यापूर्वी सरावा दरम्यान छोले भटुरे खाण्यास नकार दिला. त्याऐवजी त्याने आपल्या संघातील खेळाडूंसोबत कढी भाताचा आनंद घेतला. मागील तब्बल 20 वर्षांपासून दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाचे शेफ संजय झा यांनी मुलाखतीदरम्यान विराट कोहलीच्या तरुणपणीच्या सवयीं विषयी अनेक गोष्टी सांगितल्या. 


हेही वाचा : Ranji Trophy : कडेकोट सुरक्षा भेदून कोहलीला भेटण्यासाठी मैदानात पोहोचला फॅन, विराटला पाहून जे केलं.... Video Viral


 


विराटला बालपणापासून ओळखतात शेफ संजय :


सेफ संजय झा यांनी स्पोर्ट्स टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मी गेल्या 25 वर्षांपासून कँटीन चालवतोय आणि विराट कोहलीला लहानपणापासून ओळखतो. तो जेव्हा जेव्हा इथे प्रॅक्टिस करायला यायचा तेव्हा आमच्या कँटीनमधूनच जेवण जेवायचा.  त्याने इथूनच करिअरला सुरुवात केली, आज इतका मोठा खेळाडू असूनही त्याच्यात कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. आजही तो आमच्याशी तसेच वेटरशी सामान्य व्यक्तीप्रमाणे विनम्रपणेच बोलतो.  


विराटचं रणजी ट्रॉफी करिअर : 


विराटने शेवटचा सामना 2012 मध्ये गाजियाबाद उत्तर प्रदेशच्या संघाविरुद्ध खेळला होता. विराट अनेक वर्षांनी देशांतर्गत क्रिकेट सामना खेळणार असल्याने त्याचे चाहते विराटची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये एकूण 23 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये 50.77 च्या सरासरीने 1574 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 5 शतक देखील लगावली आहेत.