Virat kohli Retirement News : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat kohli) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 world Cup 2022) आपल्या खेळीने सर्वांना त्याची ताकद  दाखवून दिली होती. उगाचंच नाही विराट कोहलीला किंग म्हणून क्रिकेट जगत ओळखत. मात्र अशातच विराटच्या एका पोस्टमुळे चाहते चिंतेत पडले आहेत. कारण कोहली फॉर्ममध्ये नसताना काहींनी त्याला सन्यास घे म्हणून डिवचलं होतं. (Virat Kohli retire? Fans were also shocked by post Marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने नक्की त्याच्या पोस्टमध्ये असं काय म्हटलं आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांणा उधाण आलं आहे की कोहली आता निवृत्त होऊ शकतो. कोहलीने जी पोस्ट केली आहे त्यामध्ये त्याचा एक पाठमोरा फोटो आहे. या फोटोवर त्याने कॅप्शनमध्ये, 23 ऑक्टोबर 2022 माझ्या कायम आठवणीत राहणारा असेल. क्रिकेटच्या मैदानात अशी ऊर्जा कधी जाणवली नव्हती. कारण ती संध्याकाळ कायम आठवणीत राहणारी होती. 


 विराट कोहलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो मैदानातून पॅव्हेलियनमध्ये जाताना दिसत आहे. विराटच्या या ट्विटमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी भीती दिसून आली. विराटच्या या पोस्टवर यूजरने लिहिलं की, 2027 पर्यंत निवृत्त होऊ नकोस असं म्हटलं आहे. त्यासोबतच भाऊ अशी पोस्ट करू नको, इकडे हृदयाचे ठोके वाढले होते. काही वेळ असं वाटलं होतं की तू निवृत्ती घेतलीस. 



विराटने पोस्टमध्ये केलेल्या फोटोमध्ये ती खेळी त्याने पाकिस्तानविरूद्ध केली होती. वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान सामना अगदी श्वास रोखून धरणारा होता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला असताना आर. आश्विनने एक धाव घेत भारताला सामना जिंकून दिला होता. एकवेळ अशी होती की सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या पारड्यात होता मात्र खेळपट्टीवर विराट कोहलीने शेवटपर्यंत थांबत एक बाजू लावून धरली होती. विराटने 53 चेंडूमध्ये 82 धावा केल्या यामध्ये 6 चौकार आणि 4 षटकार खेचला होता.