मुंबई : विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांच्या मैत्रीबद्धल क्रिकेट वर्तुळात बरेच काही लिहीले आणि बोलले जाते. त्यात एक माजी तर दुसरा आजी कर्णधार. त्यामुळे त्यांच्याबाबतच्या चर्चेला नेहमीच एक वलय लाभते. आता तर, विराट कोहलीनेच या मैत्रीबद्धल व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक वेब सीरीज 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पीयन्स'मध्ये बोलताना विराटने धोनीबद्धल असलेल्या आपल्या मित्रत्वाबद्धल सांगितले आहे. विराट म्हणतो. धोनी आणि माझ्यात असलेली मैत्री ही आपलेपणातून आलेली आहे. दिवसेंदिवस आमच्यातील ही मैत्री अधिक मजबूत होत चालली आहे. आमच्या दोस्तीबद्धल मला अभिमान आहे. बाहेरच्या कोणत्याच शक्तिचा आमच्या मैत्रीवर परिणाम होत नाही. इतकेच नव्हे तर, अनेक लोक आमच्यातील मैत्रीत फूट पडेल असे  लिहीतात, बोलतात. पण, गंमत अशी की हे लिखान किंवा चर्चा ना तो वाचत ना मी. त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही.


दरम्यान, सन २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या विराटने नुकताच आपला आपला २९वा वाढदिवस साजरा केला.  पदार्पणापासूनच विराटने आपली धडाकेबाज खेळी दाखवली आहे. त्यामुळे पदार्पणापासून अपवाद वगळता त्याच्या मैदानावरील कामगिरीचा आलेख चढताच राहिला आहे. क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या विराटने आपली उत्कृष्ट खेळी दाखवून दिली आहे.


विराटने ६० सामन्यांमध्ये ४९.५५च्या सरासरीने ४६५८ धावा केल्या आहेत. त्यापैकी, २०२ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ५५.७४ च्या सरासरीने ९०३० धावा आहेत. तर, ५४ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने १९४३ धवा केल्या आहेत. यंदाचे वर्ष हे कोहलीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. त्याने या वर्षात आतापर्यंत ६ शतकांच्या मदतीने १४०० हूनही अधिक धावा ठोकल्या आहेत. या काळात त्याच्या धावांची सरासरी ७६.८४ इतका राहिला आहे.