केपटाऊन : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलाय. कर्णधार विराट कोहलीही तीन आठवड्यांची सुट्टी संपवून संघात परतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच जानेवारीपासून भारत आणि द. आफ्रिका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेआधी विराटने झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघ मालिकेसाठी सज्ज असल्याचे सांगितले. 


भारतीय संघ मालिकेसाठी सज्ज


भारताने १९९२नंतर दक्षिण आफ्रिकेत एकही मालिका जिंकलेली नाहीये. त्यामुळे या मालिकेत हा जुना इतिहास पुसण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. कोहलीच्यया नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात भारतीय संघाने चांगली कामगिरी केलीये. २०१७ हे वर्ष भारतीय संघासाठी चांगले गेले. त्यामुळे पुढील वर्षातही कामगिरीत सातत्य ठेवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. 


नशिबावर विश्वास आहे का?


यावेळी विराटला तुझा नशिबावर विश्वास आहे का हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना विराट म्हणाला, मला नाही माहीत. माझ्या मते आमची गोलंदाजी, तसेच जितका फलंदाजीचा आम्हाला अनुभव आहे त्यानुसार आम्ही निश्चितच येथे जिंकू शकतो. यात शंका नाहीये. जर आमच्या डोक्यात असं काही नसेल तर मला नाही वाटतं की आम्हाला फ्लाईट पकडून येथे यायला हवे होते.