लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला होता. फक्त एका टेस्ट मॅचच्या कामगिरीनंतर भारतीय बॅटिंगवर टीका करु नका. भारतीय बॅट्समनची समस्या तंत्र नसून मानसिकता आहे, अशी प्रतिक्रिया विराट कोहीलनं दिली आहे. बॅट्समननी सुरुवातीचे २०-३० बॉल संयमानं खेळले पाहिजेत. यावेळी आक्रमक रणनिती नसावी, असा सल्ला विराट कोहलीनं भारतीय बॅट्समनना दिला आहे. तसंच मी कर्णधार म्हणून जेवढं करणं शक्य आहे तेवढं करतोय. माझा प्रत्येक खेळाडूशी चांगला संवाद आहे, असं उत्तर विराटनं त्याच्या कर्णधारपदाच्या कामगिरीवर दिलं आहे.


दोन स्पिनर घ्यायचे संकेत


९ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. या मॅचसाठीची खेळपट्टी सुकलेली दिसत आहे. त्यामुळे आम्ही दोन स्पिनरना घेऊन मैदानात उतरू शकतो, असे संकेत विराटनं दिले आहेत. त्यामुळे अश्विनबरोबर रवींद्र जडेजा किंवा कुलदीप यादवला टीममध्ये संधी दिली जाऊ शकते.