मुंबई : दिवाळी निमित्त झी टीव्हीसाठी विराट कोहली  आणि आमिर खानने एका खास चॅट शो मध्ये सहभाग घेतला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 विराटने या शोमध्ये त्याच्या वैयक्तिक आणि क्रिकेट करियरमधील अनेक गंमतीजंमती सांगितल्या आहेत. 


विराट कोहली त्याच्या तुफान बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. पण धडाकेबाज विराट पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमिर हा बॉलिंग करत असेल तर फार दक्षतेने खेळावे लागते असे म्हणाला आहे.  मोहम्मद आमिरच्या बॉलवर बेभान होऊन शॉट्स मारणे शक्य  नाही. त्याच्या समोर खेळताना सांभाळूनच खेळावे लागते असे विराटने सांगितले आहे. 


विराटने मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीचे यापूर्वीही कौतुक केले आहे. जर मोहम्मद आमिर मॅच फिक्सिंगमध्ये अडकला नसता तर नक्कीच आतापर्यंत तो यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला असता. 


मोहम्मद आमिरही विराटला बेस्ट मानतो - 


काही महिन्यांपूर्वी जेव्हा पाकिस्तानी गोलंदाज आमिरने ट्विटरवर आपल्या चाहत्यांसोबत गप्पा मारल्या होत्या तेव्हा जागतिक क्रिकेट विश्वावरही गप्पा मारल्या होत्या. या वेळेस एका फॅनने जगातील चांगला फलंदाज कोण ? हा प्रश्न विचारला होता त्यावर आमिरनेही विराट कोहली असे उत्तर दिले.