मुंबई : 7 एप्रिलपासून आयपीएलचं 11 वे पर्व सुरू होणार आहे. यामध्ये रंगारंग ओपनिंग सेरेमनीच्या सोहळ्यानंतर मुंबई इंडियन्स विरूद्ध चैन्नई सुपरकिंग हा सामना रंगणार आहे. त्यापूर्वी सारेच खेळाडू नेट प्रॅक्टीस आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.   


 रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूचं सरप्राईज  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमधील इतर टीमच्या तुलनेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाचे फॅन फॉलोविंग अधिक आहे. मात्र अजून  एकदाही त्यांना विजेतेपद मिळवता आलेले नाही. दरवर्षी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यामुळे दरवर्षी आरसीबी चाह्त्यांसाठी एक सरप्राईज घेऊन येते. 


जर्सी नंबर 12 रिटायर 


आरसीबीने जर्सी नंबर 12 रिटायर केली आहे. आणि ती जर्सी आरसीबीच्या फॅन्सला समर्पित केली आहे. आरसीबीद्वारा शेअर करण्यात आलेल्या फेजबूक पेजवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. विराट कोहलीने फॅन्सला धन्यवाद म्हटले आहे. ' आज टीमबाबत बोलण्यासाठी नव्हे तर टीमच्या मागील टीमसाठी मी आलो आहे. ती टीम म्हणजे 'फॅन्स' आहे. इतकी वर्ष आम्हांला पाठिंबा देणार्‍या फॅन्सला खास ट्रीब्युट आहे.' 


 



केवळ फॅन्ससाठी जर्सी 


'12 नंबर लिहलेली जर्सी ही केवळ चाहत्यांसाठी असेल. आमचे सारेच फॅन्स आपल्या टीमचे 12 वे सदस्य आहेत. ' अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आरसीबीचा पहिला सामना 8 एप्रिलला कोलकत्त्यातील ईडन गार्डनमध्ये खेळला जाईल. कोलकत्ता नाईड रायडर्स विरूद्ध हा सामना खेळला जाईल.