मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येकजण आपल्या जवळच्या महिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. विराट कोहलीने (Virat kohli) एक खास फोटो महिला दिनानिमित्त शेअर केलं आहे. या फोटोची जोरदार चर्चा (Virat Kohli shared Vamikas Picture) रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोसोबत विराट लिहीतो की,'एखाद्या मुलाला जन्म घेताना पाहणे म्हणजे मनुष्याला मिळणारा सर्वात मेरुदंड, अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक अनुभव आहे. हे अनुभवल्यानंतर महिलांचं खरं सामर्थ्य आणि देवत्व समजलं आहे. देवाने त्यांच्यामध्ये जीवन का निर्माण केले. कारण ते पुरुषांपेक्षा अधिक शक्तीशाली आहेत. माझ्या आयुष्यातील सर्वात उत्कट, दयाळू आणि शक्तीशाली महिलेला महिला दिनाच्या शुभेच्छा.



विराट कोहलीने पहिल्यांदा आपल्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ११ जानेवारी रोजी अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. या दोघांनी आपल्या लेकीचं नाव 'वामिका' असं ठेवलं आहे. १ फेब्रुवारी रोजी अनुष्काने लेकीचा पहिला फोटो शेअर केला होता. यासोबतच त्यांनी तिचं नाव जाहीर केलं होतं. अनुष्काचा आता लेकीसोबत आणखी एक फोटो समोर आला आहे.


माझ्या आयुष्यातील खास महिलेला महिला दिनाच्या शुभेच्छा. असं म्हणतं तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत. विराट अनुष्काच्या लेकीचा फोटो पाहण्यासाठी चाहते खूप आतुर आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी शेअर केलेला फोटो हा अतिशय खास आहे. 


काही दिवसांपूर्वी अनुष्का विराटने आपल्या लेकीचा फोटो शेअर केला होता. अनुष्का आणि विराट प्रेमाने लेकीकडे पाहत होते.