विराटने शेअर केला अनुष्कासोबतचा वर्कआऊट व्हिडिओ...
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत नेहमी सोशल मीडियावर फोटोज शेअर करत असतो.
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत नेहमी सोशल मीडियावर फोटोज शेअर करत असतो. अलिकडेच त्याने जीममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याच्यासोबत अनुष्काही दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत विराट कोहलीने लिहिले की, ट्रेनिंग टूगेदर मेक्स इट इवेन बेटर.’
पहा व्हिडिओ...
व्हिडिओत विराट बोलतोय की, अनुष्का अधिक कार्डियो करते आणि ती अत्यंत स्ट्रॉंग आहे. त्यावर अनुष्का हसत म्हणते, 'रबिश.'
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सुमारे १५ लाख लोकांनी पाहिला आहे. विराटच्या या व्हिडिओनंतर लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली.
चॅंलेजची पूर्तता
सुरुवातीला केंद्रीय क्रीडामंत्री आणि ओलंपिक रौप्यपदक विजेता राज्यवर्धन सिंग राठोडने विराट कोहलीला फिटनेस चॅलेंज दिले होते. विराटने ते स्वीकारले आणि पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि पत्नी अनुष्काला दिले. अनुष्काने ते स्वीकारुन लगेचच पूर्ण केले. मात्र पंतप्रधान मोदींकडून स्वीकारलेल्या या चॅलेंजची पूर्तता झाली नाही.
झीरोच्या शूटिंगहून परतली
बुधवारीच अनुष्का अमेरीकेतून मुंबईत परतली. आगामी सिनेमा झीरोच्या शूटिंगसाठी ती अमेरिकेला गेली होती.