मुंबई : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे नेहमी धावपळ करणारे क्रिकेटपटू हे सध्या त्यांच्या घरातच आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हादेखील सध्या त्याच्या मुंबईच्या घरात आराम करत आहे. सुट्टीच्या या काळात क्रिकेटपटू त्यांच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना दिसत आहेत. विराटनेही त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने मुंबईतल्या पावसाळी वातावरणात प्रेरित होऊन पुस्तक वाचतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. 'मोसमाची मजा. मुंबईतलं वातावरण चांगलं आहे. मुंबईच्या पावसाचा माझा पहिला अनुभव, बाहेर बसून घेतोय. वाचन करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ नाही,' असं विराट म्हणाला आहे. विराटच्या या पोस्टला ३५ लाखांपेक्षा जास्त जणांनी लाईक केलं आहे. 



विराटच्या या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरनेही प्रतिक्रिया दिली. विराट कोहलीच्या दाढीत पांढरे केस दिसत आहेत, असं वॉर्नर म्हणाला. वॉर्नरच्या या प्रतिक्रियेवर विराट काहीच बोलला नाही. पण अनेकांनी यावरून वॉर्नरला ट्रोल केलं. वॉर्नर विराटवर जळतो. टिकटॉक व्हिडिओपेक्षा हे चांगलं आहे. जेवढी जास्त शतकं तेवढे जास्त पांढरे केस, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी वॉर्नरच्या कमेंटवर केल्या. 


तर दुसरीकडे तुझ्या हातात गृहशोभा मासिक आहे का? असा प्रश्न हरभजन सिंगने विराटला विचारला. एबी डिव्हिलियर्सनेही विराटच्या फोटोचं कौतुक करत 'सोफिस्टिकेटेड' अशी कमेंट केली. डिव्हिलियर्सच्या या कमेंटला १२ हजारांपेक्षा जास्त लाईक मिळाल्या आहेत.