किससे है मुकाबला? फोटो शेअर करत विराटने दिलं उत्तर
विराट कोहलीचा हा लेटेस्ट फोटो आणि लूकवर त्याचे फॅन्स खूपच खूश आहेत.
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे सिरीज लवकरच सुरू होणार आहे. 6 फेब्रुवारीपासून दोन्ही टीम मैदानावर आमनेसामने येणार आहे. ही सिरीज टीम इंडियासाठी फार खास आहे. मुख्य म्हणजे नवा कर्णधार म्हणून कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच सिरीज असणार आहे. माजी कर्णधार विराट कोहली देखील या सिरीजसाठी सज्ज झाला आहे.
रविवारी विराटने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये विराट कोहली आरशासमोर उभा असलेला दिसतोय. या फोटोला कोहलीने एख उत्तम असं कॅप्शनही दिलंय. तुमची स्पर्दा नेहमी तुमच्यासोबतच असते, असं विराटने त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.
विराट कोहलीचा हा लेटेस्ट फोटो आणि लूकवर त्याचे फॅन्स खूपच खूश आहेत. त्याचा हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
विराट कोहलीसाठी ही मालिका खूप खास आहे. टी-20, वनडे आणि टेस्ट टीमचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आता फलंदाज म्हणून टीमचा भाग आहे. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्याची कोहलीची पहिलीच वेळ असेल.
कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सिरीज खेळली होती. पण त्यावेळी टीम इंडियाची कमान केएल राहुलने सांभाळली होती. कारण रोहित शर्मा दुखापतीमुळे या सिरीजचा भाग होऊ शकला नव्हता.