Virat Kohli Dance Video : टीम इंडियासाठी महत्त्वाचा असलेला भारत आणि नेपाळ (IND vs NEP) यांच्यातील सामना सध्या श्रीलंकेत खेळवला जात आहे. आशिया कप स्पर्धेतील 5 वा सामना टीम इंडिया जिंकेल यात काही शंका नाही. मात्र, टीम इंडियाच्या रस्त्यात काटा बनू शकतो पाऊस... आजच्या सामन्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशातच टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाची सुरूवात खराब झाल्याचं दिसून आलं होतं. नेपाळ संघाची पहिली विकेट 10 व्या ओव्हरमध्ये पडली. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलाच संतापला होता. मात्र, दुसरीकडे टीम इंडियाचा किंग कोहली (Virat Kohli) मात्र, आपल्याच छुंदीत असल्याचं दिसून आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या सामन्यादरम्यान एक अतिशय विलोभनीय दृश्य पाहायला मिळालं. त्या दृश्याचा व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यादरम्यान एका महिला चाहत्याच्या खास विनंतीवर डान्स (Dance Video) करताना दिसला आणि त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. आशिया कपपूर्वी टीम इंडियाचा विराट कोहलीने हार्दिक पांड्याची माकडचेष्ठा केली होती. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली एका नेपाळी गाण्यावर ठुमके लगावताना दिसतोय.


भारत आणि नेपाळ यांच्यात सामना सुरू होता. भारताला पहिल्या विकेटची गरज होती. त्यावेळी कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख यांनी नेपाळला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे रोहित शर्माचं टेन्शन प्रत्येक ओव्हरनंतर वाढत होतं. त्यावेळी रोहित शर्मा फिल्डिंग लावण्यात व्यस्थ होता. तर दुसरीकडे विराट कोहलीची चांगलीच मज्जा सुरू होती. स्टेडियममध्ये नेपाळी गाणं वाजत असताना एका महिलेने विराटला डान्स करण्याची विनंती केली. त्यावेळी विराटने देखील तिच्या विनंतीला मान देत ब्रेक डान्स करून दाखवला. 


पाहा Video




दरम्यान, कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख यांच्या चांगल्या सुरूवातीनंतर टीम इंडियाचा डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजा याने जादू दाखवली अन् तीन विकेट पारड्यात पाडल्या. तर शार्दुल ठाकूरने सलामी जोडी फोडली होती. तर सिराजने दुसऱ्या स्पेलवर दोन विकेट घेतल्या अन् सामना भारताच्या बाजूने झुकवला.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


नेपाळ  : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी.