Virat Kohli : भारतीय टीमच्या फलंदाजांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border–Gavaskar Trophy) चौथ्या सामन्या तुफान फलंदाजी केली. यावेळी टीम इंडियाच्या (Ind Vs Aus 4th Test) फलंदाजांनी ऑस्ट्रेलियापेक्षाही उत्तम फलंदाजी करत 86 रन्सची आघाडी घेतली. यावेळी केवळ विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubman Gill) नाही तर गोलंदाज अक्षर पटेलने देखील उत्तम फलंदाजी केली. दरम्यान विराटने या सामन्यात शानदार शतक झळकावलं. मात्र यामध्ये विराट आणि मार्नस लाबुशेन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहली 186 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतला. मात्र फलंदाजी करत असताना त्याच्या एका शॉटमुळे मार्नस लाबुशेन जखमी होता होता वाचला. कोहलीच्या या थप्पड शॉटची घटना कॅमेरात कैद झाली आहे.


Virat Kohli चा लाबुशेनला थप्पड शॉट 


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी विराट कोहलीने त्याच्या टेस्ट करियरमधील 28 वं शतक ठोकलं. यावेळी विराट कोहलीच्या फलंदाजीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये विराट (Virat Kohli) च्या थप्पड शॉटपासून ऑस्ट्रेलियाचा फिल्डर लाबुशेन जखमी होता होता वाचला. 


भारतीय डावाची 167 वी ओव्हर सुरु होती. यावेळी नॅथल लिऑन गोलंदाजी करत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराटने जोरदार शॉट मारत फोर मारली. अशातच विराटच्या शॉट लॉंग फिल्डींगला उभा असलेला लाबुशेन शॉटचा जोर पाहून खाली वाकला. यामुळे त्याला बॉल लागला नाही. जर त्याला हा बॉल लागला असता तर ऑस्ट्रेलिया टीमसाठी मोठी अडचण आली असती. 



विराटचं 28वं शतक


ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात (Ind Vs Aus 4th Test) विराट कोहलीने शतक (Century) ठोकलं आहे. तब्बल तीन वर्षांनी विराट कोहलीने शतक केलं आहे. विराट कोहलीचं कसोटी करिअरमधील हे 28 वं शतक आहे. यानिमित्ताने विराटने टी-20, वन-डे नंतर आता कसोटी मालिकेतील शतकांची प्रतिक्षा अखेर संपवली आहे. तब्बल 41 डावांनंतर कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शतक केलं आहे. विराट कोहलीने 243 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं.