मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला श्रीलंकेच्या विरूद्ध टी 20 इंटरनॅशनल सिरीजमधून ब्रेक घेतल्यामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच विराट कोहलीने मिलानमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाह केला आहे. या लग्नानंतर विराट कोहलीला आयसीसीद्वारे जाहिर केलेल्या टी 20 इंटरनॅशनल बॅटिंगच्या रँकिंगमध्ये प्रथम स्थान गमवावं लागलं आहे. आता विराट कोहली 2 स्थान गमवून तिसऱ्या स्थानावर आलं आहे. आयसीसीने सोमवारी टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी 20 इंटरनॅशनल मॅचनंतर टी 20 रँकिंगची यादी जाहीर केली आहे. 


यादीत विराट कोहली का आला खाली? 


विराट कोहलीला पाठीमागे टाकत ऑस्ट्रेलिया ओपनर आरोन फिंच नंबर 1 क्रमांकावर गेला आहे. दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा एविन लुईस विराजमान झाला आहे. विराटला या तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये न खेळण्याचा हा परिणाम महागात पडला आहे. 


सिरिजच्या अगोदर कोहली 824 धावांसोबत पहिल्या स्थानावर होता. मात्र तीन सामन्यात न खेळल्यामुळे विराट कोहलीचं प्रती मॅच 2 टक्के नुकसान झालं आहे. यामुळे आता 824 अंकावरून सरळ 776 धावांवर पोहोचला आहे. तिसऱ्या अंकावर असलेल्या विराट कोहली हा फिंचपासून 8 आणि लुईस 4 अंकांनी पाठी आहे. विराट आताही टेस्ट मॅचमध्ये दुसऱ्या आणि वनडे मध्ये टॉपचा फलंदाज आहे.