Usman Khawaja Understood Hindi : भारतीय टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) दुसरा सामना त्याचं होमग्राऊंड दिल्लीमध्ये खेळतोय. है मैदान किंग कोहलीला खूप आवडत असून या मैदानावर कोहलीचा रेकॉर्ड देखील चांगला आहे. अशामध्ये दुसऱ्या टेस्ट सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा केली जातेय. दरम्यान या मॅचमध्ये टीप्स देताना विराटसोबत (Virat Kohli) एक किस्सा घडलाय आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने 263 रन्सवर कांगारूंना ऑलआऊट केलं. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) चांगली खेळी केली. उस्मान ख्वाजाची विकेट काढणं खूप गरजेचं होतं, यावेळी विराट कोहली आर.अश्विनला हिंदीतून टिप्स देत होता. 


Virat Kohli ची हिंदी ऐकून हसायला लागला ख्वाजा


विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर चांगलाच एक्टिव्ह असतो. आजच्या सामन्यामध्ये उस्मान ख्वाजा फलंदाजी करत होता. तर आर. अश्विन गोलंदाजीसाठी आला होता. ख्वाजाला आऊट करण्याचा पुरेपुर प्रयत्न टीम इंडियाकडून केला जात होता. अशामध्ये स्लिपमध्ये उभा असलेला विराट कोहली हिंदीमध्ये म्हणाला, 'यह बॉल मार रहा था'. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना हिंदी समजत नसल्याने त्यांना हिंदी भाषेचा वापर केला.


मात्र झालं उलटंच, उस्मान ख्वाजाला हिंदी भाषा समजत असून त्याला या दोघांचंही संभाषण समजलं आणि तो हसू लागला. ज्यावेळी विराट कोहलीला ही गोष्ट समजली तेव्हा त्याला देखील हसू रोखता आलं नाही आणि मैदानात तो देखील हसू लागला.



ऑस्ट्रेलिया टीमचा पहिल्याच दिवशी ऑल आऊट


टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये देखील कांगारू फलंदाजांच्या नाकीनऊ आणल्या. 263 रन्सवर ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडूंना पव्हेलियनमध्ये पाठवलं.  यावेळी मोहम्मद शमीने कहर करत 4 विकेट्स पटकावले. तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 3-3 विकेट्स काढले. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकाँब यांनी चांगली फलंदाजी केली.