Virat Kohli and Suresh Raina: 11 वर्षांपूर्वी टीम इंडियाने श्रीलंकेवर वर्ल्डकपमध्ये नमवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. 2011 साली हा वर्ल्डकप टीम इंडियाने जिंकला होता. टीम इंडियाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावर मोठं सेलिब्रेशन केलं. दरम्यान याचवेळी मैदानावर एक मजेदार घटना घडली, ज्याची क्लिप आता व्हायरल होताना दिसतेय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 वर्ष जुन्या या व्हिडीओमध्ये विराट कोहली आणि सुरेश रैना वर्ल्डकप जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना दिसतंय. यामध्ये कोहली आणि रैना विक्ट्री लॅपमध्ये होते आणि त्यांच्या हातात वर्ल्डकपची ट्रॉफी होती. दरम्यान या व्हिडीओमध्ये या दोघांच्या बरोबर पुढे एक व्यक्ती चालताना दिसतो. 


यावेळी सुरेश रैना आणि विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसून येतात आणि जाणूनबूझून त्या समोर चालत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर ती ट्रॉफी मारतात. ज्यावेळी त्या व्यक्तीला ही ट्रॉफी डोक्याला लागते तेव्हा तो मागे पाहतो. यावेळी हो दोन्ही खेळाडू असं रिएक्ट करतात जसं चूकून ही घटना घडलीये. यानंतर रैना आणि विराट दोघंही हसू लागतात. 



या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसतायत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मोठा विजय नोंदवला होता. हा वर्ल्डकप सचिन तेंडुलकरचा सहावा आणि शेवटचा होता. विजयाच्या वेळी सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन युवा भारतीय खेळाडूंनी आनंद साजरा केला होता.