नागपूर : प्रदीर्घ काळ अखंडपणे क्रिकेट खेळत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सध्या अल्प काळासाठी विश्रांती घेतली आहे. दरम्यान, विश्रांतीवर असलेल्या विराटने क्रिकेटपटूंच्या पगाराचा मुद्दा उपस्थित केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, विराटने म्हटले आहे की, क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूंना मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ व्हावी असा मुद्दा विराटने मांडला आहे. भारतीय संघात खेळणाऱ्या टॉप खेळाडूंची कमाई वर्षाकाटी दुप्पट फायद्यासोबत 3 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 20 कोटी रूपये इतकी आहे.


बीसीसीआयने केले मोठे डील


दरम्यान, शुक्रवारी दिल्ली येथे बीसीसीआयसोबत होणाऱ्या बैठकीत खेळाडूंना मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. क्रिकेट बोर्डाने सप्टेबर महिन्यात टेलिव्हीजन प्रसारण अधिकाऱ्यांशी मोठी डील केली आहे. जगभरातील प्रसारमाध्यमांतील बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रूपर्ड मरडॉकच्या स्टार इंडिया चॅनलसोबत 2018 ते 2022 पर्यंत आयपीएलचे सामने दाखविण्याबाबतचा करार बीसीसीआयने केला आहे. या प्रसारणाबद्दल बीसीसीआयला 2.5 अरब डॉलर्स इतकी रक्कम मिळणार आहे.


खेळाडूंना म्हणून हवा वाढवून पगार


दरम्यान, भारतीय संघातील क्रिकेट खेळाडूंचा करार 30 सप्टेबरला संपला आहे. त्यामुळे नव्या करारासोबत भारतीय खेळाडूंना मिळणारा पगार आणि भत्त्यांमध्ये वाढ व्हावी यासाठी खेळाडूंकढून बीसीसीआयवर दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे.


विराट, धोनी, शास्त्री करणार क्रिकेट बोर्डासोबत बोलणी


दरम्यान, खेळाडूंच्या पगाराबाबत आजी कर्णधार विराट कोहली आणि माजी करणधार महेंद्रसिंग धोनी तसेच, रवि शास्त्री क्रिकेट बोर्डासोबत बोलणी करण्याची शक्यता आहे.