Virat Kohli Instagram Post: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला (WTC Final 2023) सुरुवात झाल्यापासून विराट कोहलीची (Virat Kohli) वागणूक चाहत्यांना खटकत असल्याचं दिसतंय. त्यामुळे विराट कोहलीला ट्रोल देखील केलं जातंय. विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात खरंच सायलेंट वॉर सुरू आहे का? असा सवाल विचारला जातोय. अशातच विराट कोहलीच्या इन्टाग्राम स्टोरीवरून (Virat Kohli Instagram Story) अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल अनेकांनी अंदाज लावत असतानाच आता विराट कोहली सोशल मीडियावर (Social Media) नियमितपणे सिक्रेट मॅसेज पोस्ट करत असल्याचं दिसतोय. महत्त्वाच्या अशा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना सुरू झाल्यापासून विराट कोहली इन्टाग्रामवर नियमित स्टोरी पोस्ट करताना दिसतोय. पराभवानंतर देखील विराटने स्टोरी शेअर केली.


सामन्याच्या दुसऱ्या दिवशी निराशाजनक कामगिरीनंतर विराटने एक स्टोरी पोस्ट केली होती. You must develop the ability to be disliked in order to free yourself from the prison of other peoples' opinions म्हणजे इतर लोकांच्या मतांच्या तुरुंगातून स्वत:ला मुक्त करण्यासाठी तुम्ही नापसंत होण्याची क्षमता विकसित केली पाहिजे, अशा आशयाची स्टोरी विराटने पोस्ट केली होती. त्यामुळे विराटला नक्की काय म्हणायचंय, असा सवाल अनेकांना पडला होता.


विराट कोहली संघ निवडीवर नाराज होता किंवा कदाचित त्याच्या सूचना संघ व्यवस्थापनाने स्वीकारल्या नाहीत, अशी चर्चा आहे. ओव्हलवर ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर दुसरी स्टोरी पोस्ट केली. Silence is the source of great strength म्हणजेच, शांतता हा महान शक्तीचा स्रोत आहे, अशी स्टोरी विराटने पोस्ट केली होती. त्यामुळे टीम इंडियामध्ये सर्वकाही अलबेल आहे का? असा सवाल विचारला जात आहे.


आणखी वाचा - MS Dhoni: 'धोनीच एकटाच खेळत होता, बाकीचे...'; माहीच्या फॅन्सला हरभजनचा पुणेरी टोमणा!


दरम्यान, दोन वर्षापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील वादामुळे तुफान चर्चा रंगली होती. विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि रोहितच्या खांद्यावर जबाबदारी आली. त्यानंतर आता विराट मोकळेपणाने खेळताना दिसतोय. अशातच आता पुन्हा टीम इंडियामध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय की काय? अशी चिंता सर्वांना सतावत आहे.