मुंबई : शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बंगळूरूने मुंबईवर 7 विकेट्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यात झालेल्या एका घटनेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या सामन्याचा एक व्हिडीयो व्हायरल झाला असून यामध्ये विराट कोहली शिविगाळ करताना दिसतोय. 


विकेटनंतर विराट कोहली संतापला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने 48 रन्सची खेळी खेळली. डेवाल्ड ब्रेव्हिसच्या बॉलवर तो ज्या पद्धतीने आऊट झाला, त्यावर प्रश्न उपस्थित केले जातायत. यावेळी विराट कोहलीही संतापलेला दिसून आला.


19व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विराट कोहलीला शॉट मारला. यावेली बॉल पॅडवर लागताच डेवाल्डने जोरदार अपील केलं आणि ऑनफिल्ड अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी विराटला करार दिला. विराटने क्षणाचाही विलंब न करता रिव्ह्यू घेतला आणि हातवारे करत चेंडू आणि बॅटचा संपर्क झाल्याचं सांगितलं.



दरम्यान अल्ट्राएजमध्ये बॉल आणि बॅट यांच्यात काही संपर्क झाला होता की नाही हे योग्य पद्धतीने समजू शकलं नाही. त्यामुळे विराट कोहलीला आऊट देण्यात आलं. यानंतर संतापलेल्या कोहलीने रागाच्या भरात प्रथम मैदानावर बॅट आपटली. तसंच उघडपणे शिवीगाळ करतानाही तो कॅमेरात कैद झाला. यावेळी त्याचे सहकारी त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 152 धावाचं आव्हान आरसीबीने 18.3 ओव्हरमध्ये  3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूला 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईचा हा या मोसमातील सलग चौथा पराभव ठरला.