Virat Kohli Bharat Video: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट (Virat Kohli) ने पुन्हा एकदा टेस्ट सामन्यामध्ये आपला खेळ दाखवला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus 4th Test) यांच्यामध्ये सुरु असलेल्या चौथ्या टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी क्रिजवर उभा होता. कोहलीसोबत क्रीजवर ks Bharat होता. दरम्यान यावेळी एक अशी घटना घडली, ज्यामुळे विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी विराट कोहली आणि भरतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी विराट श्रीकर भरतला चांगलीच फटकार लगावताना दिसतोय. 



केएस भरतवर संतापला कोहली


टीम इंडियाचे फलंदाज शुभमन गिल आणि किंग कोहली यांनी टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणलं होतं. सामन्यामध्ये एक वेळ अशी आली होती, जिथे विराट कोहली त्याच्या टेस्ट करियरच्या 29 व्या अर्धशतकाच्या जवळ होता. मात्र याचपूर्वी भरत आणि किंग कोहली यांच्यामध्ये लाईव्ह सामन्यामध्ये बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. 


दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होतोय. टीम इंडियाच्या डावाची 109 वी ओव्हर सुरु होती. यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्पिनर गोलंदाज टॉड मर्फी गोलंदाजी करत हातो. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर विराट फ्लिक शॉट खेळला आणि रन घेण्यासाठी धावला, मात्र फिल्डरची वेगवान हालचाल पाहून भरत मात्र पिचवर थांबला. दरम्यान भरतची ही गोष्ट कोहलीला अजिबात आवडली नाही. 


...तर विकेट गमावली असती


भरतने रन घेतला नाही हे कोहलीला चांगलच खटकलं. हा रन काढण्याच्या नादात विकेट गेली असती. जर असं झालं असतं, तर टीम इंडियाला ते फार महागात पडलं असतं.  तर टीम इंडियाला ते महाग पडलं असतं. त्यामुळे भर मैदानात विराट कोहली भरतवर संतापला. 


विराट कोहलीचं शतक 


ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात (Ind Vs Aus 4th Test) विराट कोहलीने शतक (Century) ठोकलं आहे. तब्बल तीन वर्षांनी विराट कोहलीने शतक केलं आहे. विराट कोहलीचं कसोटी करिअरमधील हे 28 वं शतक आहे. यानिमित्ताने विराटने टी-20, वन-डे नंतर आता कसोटी मालिकेतील शतकांची प्रतिक्षा अखेर संपवली आहे. तब्बल 41 डावांनंतर कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शतक केलं आहे. विराट कोहलीने 243 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं.