विराटच्या सर्वात मोठ्या विरोधकाचा दावा, भारतच जिंकणार T20 world cup
विराट कोहलीचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीचा सर्वात मोठा शत्रू मानला जाणारा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, भारताचा शानदार संघ पाहिला तर वाटतं की, टी-20 विश्वचषक तेच जिंकतील. विराट कोहलीचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल. विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ हे जगातील सर्वोत्तम फलंदाज आहेत. विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात अनेकदा तुलना केली जाते की कोणता फलंदाज महान आहे.
कोहलीचा सर्वात मोठा विरोधक
सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. रोहित शर्मा (60), केएल राहुल (39) आणि सूर्यकुमार यादव (38) यांनी उपयुक्त डाव खेळला. कोहलीनेही या सामन्यात गोलंदाजी केली, कारण भारत सहाव्या गोलंदाजीचा पर्याय शोधत आहे. स्मिथने 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'ला सांगितले,' तो एक उत्तम संघ आहे आणि त्यांच्याकडे काही महान मॅचविनर आहेत. 'आयपीएल आधीच झाल्यामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून या परिस्थितीत खेळत आहेत. त्यांना इथे सवय झाली आहे.' तो म्हणाला, 'पुन्हा काही वेळ क्रीजवर घालवणे चांगले असते. तीन विकेट्स पडल्यानंतर हे सोपे नाही. "मी आयपीएलमध्ये अनेक सामने खेळलो नाही पण नेटमध्ये बराच वेळ घालवला आणि यामुळे मला परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत झाली,"
टी-20 विश्वचषकापूर्वी भारताने आपल्या दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील एक मजेदार क्षणाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. वास्तविक, या सामन्यात विराट कोहली ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गोलंदाजी करताना दिसला. कांगारू फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही गोलंदाजीसाठी विराट कोहलीची खिल्ली उडवली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहलीची अनोखी गोलंदाजी अॅक्शन स्टीव्ह स्मिथसाठी हैराण करणारी होती. क्रिझवर असलेल्या स्मिथने कोहलीचा पहिला चेंडू वाचणे पूर्णपणे चुकवले. त्याचवेळी, स्मिथने लाँग-ऑफच्या दिशेने फटकेबाजी करताना कोहलीच्या ब़ॉलिंगवर शॉट खेळला, त्यावेळी त्याने एक मजेदार प्रतिक्रिया दिली.
स्मिथ कोहलीच्या आर्म बॉलिंग अॅक्शनची कॉपी करताना दिसला. स्मिथ कोहलीच्या कृतीचे अनुकरण करत हसत होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 5 बाद 152 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 17.5 षटकांत 153 धावा करत सामना जिंकला.