`म्हणून शोएब तेवढ्या वेगानं बॉलिंग...`, सेहवागचा शोएब अख्तरवर मोठा आरोप
रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरवर विरेंद्र सेहवागचा गंभीर आरोप
मुंबई : भारताचे माजी ओपनर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने जगप्रसिद्ध असलेल्या वेगवान बॉलरवर केलेले आरोप गंभीर आहेत.
शोएब अख्तर सर्वात वेगवान बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे. 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 161.3 किमी ताशी वेगाने बॉलिंग केली होती. त्यावरूनच आता सेहवागने आरोप केला आहे.
शोएब अख्तर चकिंग (Chucking) करायचा त्यामुळे तो एवढ्या वेगाने बॉल टाकू शकला असा गंभीर आरोप सेहवागवर करण्यात आला आहे. यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. नियमानुसार चकिंग बेकायदेशीर आहे. त्यामुळे याविरोधात कठोर कारवाई होऊ शकते.
विरेंद्र सेहवागने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं की शोएबला माहिती होतं की त्याचं कोपर बॉलिंग करताना दुमडलं जातं. तो चक्का बॉल टाकतो नाहीतर आयसीसीने त्याला बॅनच कशाला केलं असतं.
शोएबचा हात कुठे आणि कसा वळतो हे त्यालाही कधीकधी समजायचं नाही. ब्रेट लीचा हात सरळ राहायचा. त्यामुळे त्याचा बॉल खेळायला फलंदाजांना थोडं सोपं जात होतं.
शोएब अख्तरने 46 सामन्यात 178 विकेट्स आपल्या नावावर केल्या. 163 वन डे सामन्यात 247 विकेट्स आपल्या नावावर केल्या आणि 15 टी 20 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत. सेहवागने केलेले आरोप गंभीर आहेत. आता त्यावर शोएब अख्तर काय उत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तू माझ्यासारखं बॉलिंग करण्याचा प्रयत्न करशील तर हाडं मोडतील असं शोएब अख्तर उमरान मलिकला म्हणाला होता. त्यानंतर आता सेहवागनं शोएबवर हा गंभीर आरोप केला आहे.