नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज विरेंद्र सेहवाग आज आपला ३९ वाढदिवस साजरा करत आहे. २० ऑक्टोबर १९७८ ला हरयाणाच्या जाट परिवारात त्याचा जन्म झाला. आपल्या विस्फोटक खेळीसाठी तो ओळखला जातो. क्रिकेटमधून स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवृत्ती घेतल्यानंतर सेहवाग कॉमेंट्रीमध्ये झेंडे रोवत आहे. त्याची मजेदार कॉमेंट्री आणि ट्विट्स चाहत्यांना आनंद देत आहेत. 
सेहवाग हा क्रिकेटच्या इतिहासातील असा खेळाडू आहे ज्याने टेस्टमध्ये त्रिशतक सिक्सर मारून पूर्ण केले आहे. क्रिकेटच्या १२७ वर्षांच्या इतिहासात कोण्याही क्रिकेटपटूने ही कामगिरी केली नाही.
सेहवागने २८ मार्च २००४ ला पाकिस्तानविरूद्ध ही ऐतिहासिक कामगिरी केली होती.



यावेळी सेहवाग २९५ धावांवर फलंदाजी करीत होता. पाकिस्तानचा गोलंदाज सक्वेन मुश्ताक गोलंदाजी करत होता. मुश्ताकच्या गोलंदाजीवर सेहवागने षटकार लगावून त्रिशतक शतक पूर्ण  पहिला फलंदाज ठरला. पाक विरुद्ध ३०९ धावांची खेळी करणाऱ्या सेहवागला त्यानंतर 'मुल्तान का सुल्तान' म्हणून ओळखले जाऊ लागले.
त्यानंतर २०१४ मध्ये, कुमार संगकाराने सेहवागनंतर आपले त्रिशतक सिक्सरने पूर्ण केले होते. याआधी सेहवाग द्विशतकांपासून फक्त ५ रन्सने मागे होता. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सेहवाग १९५ धावा काढून बाद झाला. सेहवाग दुहेरी शतक सिक्सर मारून पूर्ण करु इच्छित होता. पण या नादात तो १९५ वरच आऊट झाला. सेहवागच्या त्रिशतकाच्या आधीचा हा सामना होता.