नवी दिल्ली :  टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग कायम आपल्या ट्विट्समुळे चर्चेत असतो. अगदी गंभीर मुद्यावर देखील विरेंद्र सेहवाग ट्विट करून साऱ्यांच लक्ष वेधून घेतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असंच एक ट्विट सेहवागने आजच्या बाल दिनानिमित्त शेअर केलं आहे. ही माहिती फार कमी लोकांना माहित असेल. विरेंद्र सेहवागने एका लहान मुलाचा फोटो शेअर केला आहे. जो भारतातील सर्वात लहान शहीद मुलगा आहे. हा फोटो आहे शहीद बाजी राऊतचा. सेहवागने आपल्या ट्विटरवर चार वाक्याचे ट्विट केले आहे. ज्यामध्ये शहीद मुलाचा फोटो असून आपण यांचा त्याग कधीच न विसरता त्यांना कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. 


ओडिसाच्या ढंकेनाल जिल्ह्यातील नीलकंठपुर गावातील बाजी राऊत. या शहीद मुलाबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांनी कमी वयात मोठ धाडस केलं होतं. १२ वर्षाचे असताना ते देशासाठी शहीद झाले होते. 



कोण आहे बाजी राऊत 


जेव्हा भारत देश इंग्रजांच्या गुलामी खाली होता. तेव्हा या बालकाने अगदी लहान वयात देशभक्तीचा धडा शिकवला होता. अगदी लहान वयात त्याने मातृभूमी आणि देशप्रेम जाग केलं होतं. त्यांच्या मनात अगदी लहानपणापासून इंग्रजांविरोधात राग होता. बाजीला सतत सांगून ही तो ऐकत नसल्यामुळे इंग्रजांना राग आला. आणि त्यांनी आपला राग त्या छोट्याशा बाळावर गोळ्या झाडून व्यक्त केला. बंदूकीची गोळी बाजीच्या छातीला चिरून निघून गेली. आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. तो करूण दिवस होता ११ नोव्हेंबर १९३८ या दिवशी बाजी राऊतने आपले प्राण सोडले.