कोच पदाला हुलकावणी मिळाल्यावर पाहा कुठे गेला सेहवाग
भारतीय क्रिकेट टीमच्या मुख्य कोच पदाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांनी वीरेंद्र सेहवाग याला मागे टाकल्यानंतर आता टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज कॅनडामध्ये सुट्टीसाठी गेला आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमच्या मुख्य कोच पदाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांनी वीरेंद्र सेहवाग याला मागे टाकल्यानंतर आता टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज कॅनडामध्ये सुट्टीसाठी गेला आहे.
या निवडीनंतर सेहवाग मीडियापासून दूर गेला आहे. सध्या तो कॅनडात सुटी घालविण्यासाठी गेला आहे. इन्स्टाग्रामवर आपला फोटो पोस्ट केला आहे.
सहेवागने अजूनही काही फोटो अपलोड केले आहेत. त्यातील एका फोटोत त्याने लिहिले की कॅनडात चिल करत आहे...
रवी शास्त्रीसह गोलंदाजीसाठी जहीर खान आणि फलंदाजीसाठी राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
२०१४-१६ या कालावधीत टीम मॅनेजर राहिलेल्या शास्त्री हे गेल्या वर्षी कोच पदाच्या शर्यतीत होते. पण अखेरच्या क्षणी अनिल कुंबळे यांची नियुक्ती झाली. विराट कोहलीशी वाद झाल्यानंतर कुंबळे यांनी पदाचा राजीनामा दिला.