मुंबई : वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर खूपच अ‍ॅक्टीव्ह असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीरूच्या धडाकेबाज फलंदाजीप्रमाणेच तो सोशल मीडियामध्येही त्याकह्या खास अंदाजामध्ये ट्विट करतो. भारतीय संघाचा स्पिनर, माजी कर्णधार आणि कोच अनिल कुंबळे याचा आज वाढदिवस आहे. ट्विटरच्यामाध्यमातून सेहवागने अनिल कुंबळेला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



 


वीरेंद्र सेहवागने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खास फोटोदेखील शेअर केला आहे. आज धनतेरसही असल्याने वीरेंद्रने अनिल कुंबळेला भारताचे 'धन' अशी उपमा देत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


जय जय शिव शंभो... हॅप्पी बर्थडे जंबो असे कॅप्शनही दिले आहे. अनिल कुंबळे आज ४७ वा वाढादिवस साजरा करत आहे. २००२ साली अनिल कुंबळेने जबड्याला गंभीर दुखापत झालेली असूनही गोलंदाजी केली होते.  भारताला एक महत्त्वाची मॅच जिंकवून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता.


अनिल कुंबळे हा भारताचा पूर्व कर्णधार आणि कोचदेखील होता. मात्र विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर त्याने या पदाचा राजीनामा दिला होता.