एल्फिस्टन-परळ रेल्वे दुर्घटनेविषयी क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या भावना...
मुंबईतील एल्फिस्टन-परळ रेल्वे स्थानकावरच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मुंबई : मुंबईतील एल्फिस्टन-परळ रेल्वे स्थानकावरच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ३३ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर सामान्य नागरिकांपासून ते अगदी बॉलिवूड स्टार्स आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या दुर्घटनेत निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.
स्वप्ननगरीत माणसाचा जीव स्वस्त झाला आहे आणि हे आपले दुर्दैव आहे, असे ट्विट सेहवागने केले.
भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनेही आपल्या भावना ट्विटरद्वारे मांडल्या. मानवी आयुष्याला किंमत असल्याचे त्याने म्हटले आहे. घटनेत जखमी झालेल्या लोकांसाठी त्याने प्रार्थना केली आहे.
दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर केईएम, टाटा आणि वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.