मुंबई: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी येत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मौसमातील सामने कधी होणार त्याच्या तारखांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विवो आयपीएल 2021 हंगामाच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. BCCI ने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 14 व्या सत्राचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचा अंतिम सामना 30 मे रोजी खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना चेन्नईमध्ये तर अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.



मुंबई इंडियन्स विरुद्ध RCB पहिला सामना रंगणार


मुंबई विरुद्ध आरसीबी पहिला सामना IPL 2021 चा पहिला सामना रंगणार आहे. 5 वेळा चॅम्पियनशिप मिळवलेली आणि मागच्या हंगामातील विजयी संघ असलेला मुंबई इंडियन्स या खेळाची सुरुवात करणार आहे.




9 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता पहिला सामना चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएलचे सामने 6 शहरांमध्ये होणार आहे. यामध्ये मुंबईचाही समावेश करण्यात आला आहे. 


चेन्नई, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू इथे हे सामने रंगणार आहेत. शेवटचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. लीग टप्प्यात प्रत्येक संघ चार मैदानावर सामने खेळणार आहे. 


लीग सामन्यांपैकी प्रत्येकी १० सामने चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि बेंगळुरू येथे तर उर्वरित सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर कोणताही सामना खेळणार नाही. प्रत्येक संघ सहापैकी चार मैदानांवर आपला लीग स्टेज खेळेल.