नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या इंदोर वनडे सामन्यावेळी कॉमेंट्री करताना व्हिव्हिएस लक्ष्मणची अनेक गुपितं उघड केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्याच्या कॉमेंट्री दरम्यान, लक्ष्मणने २००७ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपचा उल्लेख केला होता. २००७ मध्ये २४ सप्टेंबर रोजीच पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. 


लक्ष्मणने फायनल सामन्याबद्दल बोलताना सेहवागला विचारले की, तू २००७ चा वर्ल्डकप फायनल सामना खेळला नव्हता. पण त्या सामन्यावेळी डगमध्ये बसून तू कोणतं गाणं गात होता? लक्ष्मणच्या या प्रश्नाला विरूने शिताफीने बगल दिली आणि उलटा लक्ष्मणकडेच प्रश्न भिरकावला.


सेहवागने लक्ष्मणला विचारले की, साऊथ आफ्रिका दौ-यावेळी तू भजन का गात होतास? विरूच्या या प्रश्नावर उत्तर देत लक्ष्मण म्हणाला की, ‘साऊथ आफ्रिकेच्या वेगवान आणि बाऊंस होणा-या विकेटवर खेळायचं असेल तर भजनच आठवणार!’. हे उत्तर दिल्यावर लक्ष्मणनेही सेहवागला चिमटा काढला. तो म्हणाला की, ‘साऊथ आफ्रिकेच्या दौ-यावर तू हनुमान चालिसा म्हणत होतास!’.