पाकिस्तानचा वहाब रियाज बॉलिंगच विसरला!
पाकिस्तानचा फास्ट बॉलर वहाब रियाजनं २०११च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला आणि २०१५च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनला चांगलाच त्रास दिला
दुबई : पाकिस्तानचा फास्ट बॉलर वहाब रियाजनं २०११च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला आणि २०१५च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनला चांगलाच त्रास दिला. २०११ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वहाबनं भारताच्या पाच विकेट घेतल्या. तर २०१५ वर्ल्ड कपमध्ये रियाजनं वॉटसनला टाकलेला तो स्पेल कायमच क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. पण श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये वहाब रियाज बॉलिंगच विसरल्याचं पाहायला मिळालं.
श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी वहाब रियाज बॉलिंग करायला आला. तेव्हा ओव्हरचा पाचवा बॉल पूर्ण करण्यासाठी रियाज तब्बल पाचवेळा पळाला. बॉलिंग रनअप चुकल्यामुळे फक्त श्रीलंकेची टीमच नाही तर पाकिस्तानची टीमही हैराण झाली होती. पाकिस्चानचा कोच मिकी ऑर्थरनं तर डोक्यावरच हात लावला.
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा कॅप्टन सरफराज अहमदनं रियाजला बॉलिंग दिली. यावेळी श्रीलंकेचा स्कोअर ३३१/४ एवढा होता. रियाजनं बॉलिंगला सुरुवात केली तेव्हा निरोशन डिकवेला बॅटिंग करत होता. डिकवेलानं रियाजच्या पहिल्या बॉलवर फोर मारली. यानंतर डिकवेलानं पुढचे तीन बॉल सांभाळून खेळले. पण पाचव्या बॉलवर मात्र रियाजनं सगळ्यांनाच हैराण केलं. असं असलं तरी रियाजनं त्याच्या ३.३ ओव्हरच्या स्पेलमध्ये १० रन्स देऊन ३ विकेट्स घेतल्या.