मुंबई : हैदराबाद विरुद्धच्या लढतीत ए बी डव्हिलियर्सनं घेतलेल्या अफलातून झेलची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. टी-20 स्पर्धेतील सर्वोत्तम झेल असं त्याचं वर्णन केलं जातंय. अॅलेक्स हेल्सचा डिव्हिलियर्सनं सीमारेषेजवळ झेल पकडत त्याला तंबूचा रस्ता भाग पडायला लावला. या सामन्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटवर डिव्हिलियर्सवर कौतुकांचा वर्षाव होतोय. कर्णधार विराट कोहलीनंही डिव्हिलिर्यसला स्पायडरमॅन म्हणत ट्विटवरुन त्याचं कौतुक केलं.