लंडन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंड मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. ३९६ रनवर डाव घोषित केल्यामुळे इंग्लंडला २८९ रनची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय बॉलरनी चांगली कामगिरी करत इंग्लंडच्या ८९ रनवर ४ विकेट घेतल्या. पण दिवसाअखेरीस इंग्लंडनं ६ विकेट गमावून ३५७ रन केले. यामुळे त्यांची आघाडी २५० रनपेक्षा जास्त झाली. इंग्लंडच्या क्रिस वोक्सचनं शतक आणि जॉनी बेअरस्टोनं ९३ रन केल्यामुळे इंग्लंडला कमबॅक करता आलं.


कार्तिकचा शानदार कॅच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉनी बेअरस्टो शतकाजवळ पोहोचत असतानाच हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर दिनेश कार्तिकनं त्याचा शानदार कॅच पकडला. कार्तिकनं विकेट कीपिंगमध्ये चपळाई दाखवली असली तरी तोपर्यंत उशीर झाला होता. कारण बेअरस्टो आणि क्रिस वोक्सनं आधीच मॅच भारताच्या हातातून खेचून नेली होती.



पहिल्या इनिंगमध्ये १०७ रनवर भारतीय टीम ऑल आऊट झाली. यानंतर मात्र भारताला या मॅचमध्ये कमबॅक करणं कठीण होतं. सुरुवातीला भारतीय बॉलरनी इंग्लंडच्या बॅट्समनना संघर्ष करायला लावला पण बेअरस्टो आणि वोक्सनं इंग्लंडला अडचणीतून सावरलं आणि मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं.