ब्रिस्टल : इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला पोलिसांनी अटक केली होती. ब्रिस्टलमध्ये भर रस्त्यात हाणामारी केल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. स्टोक्सच्या या हाणामारीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्टोक्सनं एका व्यक्तीला एका मिनीटामध्ये १५ पंच मारले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टोक्सच्या हाणामारीनंतर या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुखापत झाली. या व्यक्तीला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. ही घटना घडली तेव्हा स्टोक्सबरोबर इंग्लंडचा दुसरा क्रिकेटपटू अॅलेक्स हेलही तिकडे होता.


या सगळ्या प्रकारानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वनडेमध्ये स्टोक्सचं निलंबन करण्यात आलं. तर पोलिसांना चौकशीत मदत करण्यासाठी हेल्स स्वत:हून ब्रिस्टलला गेल्यामुळे, तोही चौथ्या वनडेला मुकला.


हाणामरीनंतर अटक झालेल्या स्टोक्सला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिलं. स्टोक्सनं स्वसंरक्षणासाठी ही हाणामारी केली का, याचीही चौकशी पोलीस करणार आहेत.


स्टोक्सच्या हाणामारीचा व्हिडिओ