विकेट मागची धोनीची कॉमेंट्री ऐकलीत का?
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी दणदणीत विजय झाला.
पुणे : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी दणदणीत विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं तीन मॅचच्या सीरिजमध्ये कमबॅक केलं आहे. मुंबईमधली पहिली वनडे हारल्यावर सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला पुण्यातली वनडे जिंकणं आवश्यक होतं.
या मॅचवेळी धोनीचा विकेट कीपिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये धोनी विराट कोहली आणि केदार जाधवला महत्त्वाचे सल्ले देताना दिसत आहे. स्टम्प मागच्या माईकमध्ये धोनीचं हे बोलणं रेकॉर्ड झालं आहे.
बरोबर टप्पा टाकत आहेस. ओव्हरमधला तिसरा बॉल असाच टाक, असं धोनी केदार जाधवला सांगत होता. तर दोन-तीन खेळाडूंना इकडेच थांबव असं धोनीनं विराट कोहलीला सांगतिलं. यावेळी विराटचा उल्लेख धोनीनं चिकू असा केला आहे.
पाहा धोनीची कॉमेंट्री