नवी दिल्ली: WWEच्या चाहत्यांना हा आठवडा महत्त्वपूर्ण असणार आहे. या आठवड्यात WWEच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त बरेच काही पहायला मिळत आहे. या आठवड्यातील शोची सुरूवातच शेन मॅकमोहन अर्थातच स्टेफनी मॅकमोहन जबरदस्त एण्ट्री केली. त्यानंतर या शोची सुरूवात करणाऱ्या की वि्न्स मॅकमोहनने एण्ट्रीकेली. मात्र, या एण्ट्रीच्या धक्क्यातून प्रेक्षक सवरतायत तोवरच स्टोन कोल्डनेही जोरदार एण्ट्री केली. त्यामुळे चाहत्यांनाआश्चर्याचा पुनर्धक्का मिळाला.


ते मेन प्राईममध्ये आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विन्सने स्टोन कोल्डला परत जाण्याविषयी सांगितले. तसेच, तो पुढे म्हणाला त्यांचे आता वय वाढले आहे आणि त्यांनी निवृत्तीही घेतली आहे. त्यानंतर त्यांनी शेनकडे पाहात निर्देश केला की सध्या ते मेन प्राईममध्ये आहेत.


शेनला दोन वेळा 'Stone Cold Stunner'


स्टोन कोल्डने पहिल्यांदा शेनला चिअरप केले मात्र थोड्या वेळाने त्याला फिनिशींग मूव्ह (Stone Cold Stunner) दिला. त्यानंतर बारी होती विन्स मॅकमोहनची.  तिसऱ्यांदा मैदानात आलेल्या विन्स मॅकमोहन आणि स्टोन कोल्डने पहिल्यांदा बियर पिली. आणि अनेकदा गळाभेट घेतली. शेवटी विन्सलाही स्टोन कोल्डने मूव्ह दिला. शेन पुन्हा उठला तेव्हा स्टोन कोल्डने त्यालाही बिअर पाजली आणि पुन्हा एकदा आपला फिनिशिंग मूव्ह दिला. त्याची ही कृती पाहून चाहत्यांना भूतकाळ आठवला. कारण, एकेकाळी स्टोन कोल्ड असाच बिअर पित असे आणि मॅकमोहन फॅमिलीच्या सदस्यांना फिनिशिंग मूव्ह देत असे.



WWE रॉच्या २५ वर्धापनानिमित्त न्यूयॉर्क येथे खास शोचे आयोजन करण्यात आले होते. एकाच वेळी हा शो मॅनहॅटन आणि बार्कलेज सेंटर येथून लाईव्ह करण्यात आला.