नवी दिल्ली : आज विरेंद्र सेहवागचा ३९ वा वाढदिवस आहे. यानिमित्तआम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो बघून तुम्ही म्हणाल की हा खरच अवलिया आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्या बॉलरला टार्गेट करायचे हे त्याच्या डोक्यात आधीच फिट असायचे. त्यानुसार तो आपली खेळी बहरत न्यायचा. २०१५ सालच्या या मॅचमध्ये सेहवागचा मस्तमौला अंदाज पहायला मिळाला. 'क्रिकेट ऑल स्टार्स टूर्नामेंट' च्या एका मॅच दरम्यान सेहवाग बॅटींग करत असताना दूसऱ्या बाजूने फास्ट बॉलर एलन डोनाल्ड हा बॉलिंग करत होता. 
ऍलन डोनाल्डच्या बॉलवर जोरदार सिक्सर मारताना सेहवाग दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानात सेहवाग बॅटींग करतोय तर सिक्सर पहायला मिळणं यात काही नवं नाहीच. पण तरीही हा सिक्सर सर्वांच्या लक्षात राहीला त्यामागे एक वेगळ कारण आहे.


सेहवागने जेव्हा सिक्सर मारला तेव्हा तो रणवीर कपूरच्या फिल्मचे 'अजब प्रेम की गजब कहानी' सिनेमाचे 'कैसे बताए क्यू तुझको चाहे' हे गाणे गात होता.
पहिल्याच षटकात जेव्हा सेहवागने डोनाल्डच्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या वर बॉल टोलवून सिक्सर लगावला तेव्हा तो या गाण्याचे शब्द गुणगुणत होता. 
 


सचिन ब्लास्टर्स आणि वॉर्न वॉरियर्स यांच्यामधला हा सामना होता. या मॅचमध्ये सेहवागने १५ बॉलमध्ये ३ फोर आणि २ सिक्सरच्या मदतीने २७ रन्स बनविले.