मुंबई : आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वात आपल्या प्रभावी खेळाच्या बळावर क्रीडारसिकांची मनं जिंकणारा नोवाक जोकोविच सध्या टोकियोमध्ये आहे. जपान ओपन ही स्पर्धा खेळण्यासाठी तो या ठिकणी आला आहे. टेनिसच्या कोर्टवर वर्चस्व गाजवणारा हा खेळाडू आमखी एका खेळात त्याचं नशीब आजमावत आहे. ज्याची सुरुवात त्याने टोकियोतूनच केली, असं म्हणायला हरकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्या व्हिडिओमध्ये ३२ वर्षीय सर्बियन खेळाडू नोवाक हा दोहयो म्हणजेच सुमो रेसलिंग रिंगमध्ये चक्क सुमो रेसलिंग करताना दिसत आहे. टेनिसच्या खेळात वर्चस्व गाजवणारा हाच नोवाक सुमोंसमोर मात्र चांगलाच थकलेला दिसला, तेव्हा ही काही त्याची वाट नाही असंच म्हणावं लागेल. 


आपल्या या आगळ्यावेगळ्या अनुभवाविषयी एटीपी या संकेतस्थळाशी संवाद साधत नोवाकने त्याची प्रतिक्रिया दिली. 'माझ्या मते मी या (सुमो रेसलिंग) खेळासाठी माझी शरीरयष्टी योग्य नाही. आणखी काही किलो वजन कमावलं तर, मी त्यांना टक्कर देऊ शकतो. मी आता दिसतोय त्याच्या तिप्पट देहयष्टी जेव्हा होईल तेव्हा मी त्यांना टक्क देऊ शकेन' असं नोवाक म्हणाला. 



नोवाकने यावेळी सुमो रेसलिंग या खेळाविषयी कुतूहलपूर्ण प्रतिक्रिया दिली. या खेळात सक्रिय असणाऱ्यांचं शरीर ज्या प्रमाणात लवचीक आहे, हे पाहणं अद्वितीय आहे, असं तो म्हणाला. किंबहुना ते इतके लवचीक असतीच असं आपल्यालाही वाटलं नसल्याचं तो म्हणाला. जपानचा एक लोकप्रिय खेळ खेळायला मिळाल्याचा आनंदही त्याने व्यक्त केला.