Shoaib Akhtar Video:  'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर कोणाला माहिती नाही, असं क्वचित पहायला मिळेल. भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या धिप्पाड शरीराच्या अख्तरच्या बॉलिंगवर अनेक खेळाडू जखमी देखील केलंय. 161.3 km/h च्या स्पीडने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान बॉल (shoaib akhtar fastest ball) टाकण्याचा पराक्रम केलाय. अशातच आता शोएब अख्तरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. (Watch Video Shoaib Akhtar Amusing Reaction As He Experiences 160 kmph Delivery marathi Sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएब अख्तरची (Shoaib Akhtar) मोठमोठ्या फलंदाजांना दहशत असायची. शरीरयष्टीहीने तगडा असल्याने शोएबचा रनअपही मोठा असायचा. त्यामुळे त्याचा बॉल गोळीगत पार होत असायचा. अख्तरच्या स्पीडचा (Shoaib Akhtar Speed) अंदाज लावणं अनेकांना जमलं नाही. अशातच शोएबने शेअर केलेल्या व्हिडिओवरून 160 च्या स्पीडने आलेल्या बॉल कसा फलंदाजाकडे जात असले, याचा अंदाज येतो.


आणखी वाचा - IPL 2023: Rishabh Pant च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, Ricky Ponting सांगितलं कधी खेळणार?


शोएब अख्तरने ट्विटरवर एक व्हिडिओ (Shoaib Akhtar Tweet) पोस्ट केला आहे. त्यामध्ये अख्तरच्या जुन्या भेदक यॉर्करची झलक पहायला मिळते. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये अख्तर बॉलिंग मशीनसोबत (bowling machine) दिसतोय. त्यामध्ये अख्तरने 100 mph म्हणजेच 160 km/h बॉलचा सामना करताना काय वाटतं याची झलक दाखवली आहे.


पाहा Video -  



दरम्यान, अख्तर नेटच्या आत जात असताना चेंडू कसा जातो आणि त्यातून कसा बाहेर येतो, यावर बोलतना दिसतोय. त्यावेळी तु कितीच्या स्पीडने गोलंदाजी केली होती, असा प्रश्न अख्तरला विचारताना दिसतोय. त्यावर अख्तरला हसू आवरंल नाही. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 2003 च्या वर्ल्ड कपमधील एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या निक नाइटला (fastest ball in cricket) अख्तरने सर्वात वेगवान बॉल टाकला होता.