Virat Kohli and Anushka Sharma With Vamika : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि पती विराट कोहली (Virat Kohli) यांची जोडी लोकप्रिय सेलिब्रिटी कपल्स पैकी एक आहे. अनुष्का आणि विराट हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनुष्का आणि विराट चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अनुष्का आणि विराटला त्यांचं खासगी आयुष्य खासगी ठेवण्यास आवडते. याच कारणामुळे त्यांनी अजून त्यांची मुलगी वामिकाचा (Vamika Kohli) चेहरा कोणाला दाखवलेला नाही. नुकताच त्या तिघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का, विराट आणि वामिकाचा हा व्हिडीओ त्यांच्या फॅनपेजनं शेअर केला आहे. या व्हिडीओ वामिका आई अनुष्काच्या मांडीवर खेळताना दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ वृंदावनचा असल्याचे म्हटले जात आहे. विराट, अनुष्का आणि वामिका हे येथे दर्शन घेण्यासाठी आले होते. या तिघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तर सगळ्यांचे लक्ष हे वामिकानं वेधले आहे. एकीकडे अनुष्का आणि विराट हे मंदिरात प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे गोंडस वामिका तिच्या खेळण्यात मग्न आहे. (Anushka, Virat and Vamika's Viral Video) 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विरुष्काच्या फॅन पेजनं हा व्हिडीओ शेअर केला असला तरी सुद्धा त्यांनी वामिकाचा चेहरा लपवलेला आहे. वामिकानं व्हिडीओत गुलाबी रंगाचा पजामा आणि जॅकेट परिधान केलेलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातील वामिका मागे वळून कोणाला तरी पाहताना दिसते. त्यानंतर पुजारी येतात आणि अनुष्काला देवाची चुनर देतात आणि विराट आणि वामिकाच्या गळ्यात हार घालतात. पोनी टेल घातलेली वामिका ही खूप गोंडस दिसत आहे. (Virat Kohli and Anushka Sharma Pray With Daughter Vamika in Vrindavan) 


हेही वाचा : Thalapathy Vijay Divorce News : लग्नाच्या 22 वर्षानंतर पत्नीला घटस्फोट देतोय विजय थलपती?


इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हे कपल बुधवारी सकाळी वृंदावनमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी येथे ब्लँकेटचे वाटप केले. विराट- अनुष्कानं ब्लॅंकेटचे वाटप केल्यानंतर आश्रमात तासभर ध्यानही केले. दोघे बाबा नीम करोली यांच्यावर दृढ विश्वास ठेवणारे आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अनुष्का, विराट आणि वामिकाने उत्तराखंडमधील आश्रमाला भेट दिली होती. त्यांनी त्या वेळी देखील ब्लँकेटचे वाटपही केले होते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अनुष्का आणि विराटने वामिकासह प्रसिद्ध कांची धामला भेट दिली. अनुष्का आणि विराट यांनी नवीन वर्षाचे स्वागत दुबईत केले. हे फोटो शेअर करत विराटनं '2023' आणि हार्ट इमोजी वापरले आहे. दुबईला जाण्यापूर्वी, अनुष्कानं तिचा आगामी चित्रपट 'चकडा एक्सप्रेस'चे शूटिंग पूर्ण केले.