WC Semi Final Scenario: अजूनही सेमीफायनलमध्ये कशी पोहोचू शकते टीम इंग्लंड? पाहा पॉईंट्स टेबलचं समीकरण
World Cup 2023 Semi Final Scenario: आता पाच सामन्यामध्ये एका विजयासह इंग्लंडची टीम वर्ल्डकपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. यावेळी इंग्लंडला अजून चार सामने खेळायचे आहेत.
World Cup 2023 Semi Final Scenario: गतविजेत्या इंग्लंडची यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी सुरुच आहे. गुरुवारी श्रीलंकेच्या टीमने इंग्लंडचा पराभव केला. या पराभवासह इंग्लंडच्या टीमने यंदाच्या सिझनमधील चौथा सामना गमावला आहे. आता पाच सामन्यामध्ये एका विजयासह इंग्लंडची टीम वर्ल्डकपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. यावेळी इंग्लंडला अजून चार सामने खेळायचे आहेत.
अजूनही सेमीफायनल गाठू शकते टीम इंग्लंड?
एकंदरीत पाहिलं तर आता इंग्लंडला उपांत्य फेरी गाठणं ( WC Semi Final Scenario ) खूप कठीण आहे. सध्या 5 पैकी 4 सामने गमावल्यानंतर इंग्लंड 2 पॉईंट्ससह टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. इंग्लंड टीमने आगामी उर्वरित 4 सामने जिंकल्यास 9 सामन्यांत 5 विजयांसह 10 पॉईंट्स होतील. सेमीफायनल ( WC Semi Final Scenario ) गाठण्यासाठी कोणत्याही टीमला किमान 6 आणि जास्तीत जास्त 7 सामने जिंकणं आवश्यक आहे. आता इंग्लंडला 10 पॉईंट्ससह नेट रनरेट सुधारणंही महत्त्वाचं आहे.
केवळ 4 सामन्यांमध्ये विजय पुरेसा नाही
जॉस बटलरच्या सेनेला आता सेमीफायनल ( WC Semi Final Scenario ) गाठण्यासाठी नशिबाची गरज आहे. यावेळी खेळण्यात येणारे आगामी सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. याशिवाय इतर टीमच्या निकालावरही लक्ष ठेवावे लागणार आहे. सध्या इंग्लंडचं नेट रनरेट मायनसमध्ये आहे, त्यामध्येही सुधारणा करावी लागणार आहे. इंग्लंडचा पुढील सामना 29 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध खेळला जाणार आहे. यानंतर 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. त्यानंतर 8 नोव्हेंबरला नेदरलँडसी सामना करायचा आहे. तर 11 नोव्हेंबरला कोलकात्यात पाकिस्तानशी सामना आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत, 29 ऑक्टोबर, लखनऊ
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 4 नोव्हेंबर, अहमदाबाद
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स, 8 नोव्हेंबर, पुणे
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, 11 नोव्हेंबर, कोलकाता
श्रीलंकेकडून इंग्लंडचा पराभव
गुरुवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंग्लंडची टीम 33.2 ओव्हर्समध्ये 156 रन्सवर ऑलआऊट झाली. प्रत्युत्तरात पथुम निसांका आणि सदिरा समरविक्रम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने 25.4 ओव्हर्समध्ये 160 रन्स केले आणि सामना 8 विकेट्सने जिंकला. तर श्रीलंकेचा हा सलग दुसरा विजय होता.