Hardik Pandya: आम्ही `त्या` ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?
Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.
Hardik Pandya: इंडियन प्रिमीयर लीगमध्ये 38 वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने 4 विकेट्सने मुंबईचा पराभव केला. मुंबईची ही यंदाच्या सिझनमधील हा सातवा पराभव होता. या पराभवासह मुंबई इंडियन्सचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं. यानंतर हार्दिक पंड्याने मोठं विधान केलं आहे. जाणून घेऊया या पराभवानंतर हार्दिक पंड्या नेमकं काय म्हणाला?
सामन्यानंतर नेमकं काय म्हणाला हार्दिक पंड्या?
पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे. या सामन्यात आम्ही ते करू शकलो नाही. अजून बॉल बघून त्याला हिट करणं गरजेचं आहे. आम्ही नेमके याचं ठिकाणी चुकलो आणि आऊट झालो. आमच्यासाठी संपूर्ण सिझन असाच राहिला.
हार्दिक पुढे म्हणाला, या खेळातून खूप काही शिकण्यासारखं आहे. हे विलक्षण आहे. मला वाटतं की, वढेराने गेल्या वर्षीही असंच केलं होतं. त्याला याआधी टूर्नामेंटमध्ये संधी मिळाली नव्हती. पण तो खूप आयपीएल खेळेल आणि भारताचे प्रतिनिधित्वही करेल.
मार्कस स्टॉइनिसचे अर्धशतक आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चार गडी राखून पराभव केला. प्रथम गोलंदाजांनी मुंबईला 7 विकेट्सच्या मोबदल्यात 144 रन्सवर रोखलं. यानंतर स्टोइनिसच्या 45 बॉल्समध्ये केलेल्या 62 रन्सच्या खेळीच्या जोरावर लखनऊने 4 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठलं. स्टॉइनिसने आपल्या खेळीत 7 फोर आणि दोन सिक्स मारले. दहा सामन्यांत सहाव्या विजयानंतर लखनऊने आता पॉईंट्स टेबलमध्ये तिसरे स्थान गाठलंय. मुंबईचा हा दहा सामन्यांमधला सातवा पराभव ठरला.
मुंबई इंडियन्ससाठी कसं आहे प्लेऑफचं समीकरण?
मुंबईचा हा यंदाच्या सिझनमधील सातवा पराभव होता. तर मुंबई इंडियन्सला इथून पुढे जर प्लेऑफ गाठायचं असेल तर त्यांना उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना हैदरबादविरुद्ध होणार आहे. तर केकेआर आणि लखनऊविरुद्ध एक एक सामना बाकी आहे. त्यामुळे आता मुंबईला प्लेऑफसाठी या दोन्ही संघांना कडवी टक्कर द्यावी लागेल.