SA vs NED: 17 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी झालेल्या सामन्यात सर्व क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. धरमशालामध्ये झालेल्या सामन्यात नेदरलँड्सच्या टीमने दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा पराभव केला. नेदरलँड्सने 38 रन्सने दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 43-43 ओव्हरचा सामना खेळवण्यात आला. दरम्यान या सामन्यानंतर नेदरलँड्सच्या टीमचा कर्णधार स्कॉट एडवर्डस फार खूश असल्याचं दिसून आलं. 


दक्षिण आफ्रिकेला नवमून स्कॉट एडवर्डस खूश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत पहिला विजय मिळवल्यानंतर कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स खूप आनंदी दिसून आला. सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये बोलताना एडवर्ड्स म्हणाला, “आम्ही मोठ्या अपेक्षेने वर्ल्डकपमध्ये आलो आहोत. आमच्याकडे खूप चांगले खेळाडू आहे. हा आम्हाला पहिला विजय मिळाल्याने मी आनंद आहे. यापुढेही आम्ही अजून सामने जिंकू अशी मला आशा आहे. आम्ही खूप बारकावे टिपत असून मॅचअप घेऊन आलो आहोत. पहिल्या काही सामन्यांमध्ये आम्ही चांगल्या स्थितीत होतो पण पुन्हा मागे पडलो. 


दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव


या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने 43 ओव्हर्समध्ये 245 रन्स केले. यावेळी नेदरलँड्सच्या टीमच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली मात्र 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या स्कॉट एडवर्ड्सने 69 बॉल्समध्ये 78 रन्स केले. त्याच्याशिवाय आर्यन दत्तनेही 9 बॉल्समध्ये 23 रन्स कुटले. 


प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 42.5 ओव्हरमध्ये केवळ 207 रन्स करू शकली. यावेळी नेदरलँड्सने हा सामना 38 रन्सने जिंकला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमने पहिल्या चार विकेट्स लवकर गमावल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलरने 43 तर केशव महाराजने 40 रन्सची खेळी केली.