T20 World Cup 2007 : नुकंतच ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUSvsIND) दौऱ्यावर 'बंदो मे था दम' अशी सिरीज (Web series) रिलीज करण्यात आली होती. क्रिकेटप्रेमींना (cricket) ही सिरीज फारच भावली. तर त्यानंतर आता पुन्हा अजून एक क्रिकेटसंदर्भात सिरीज रिलीज करण्यात येणार आहे. 2007 साली (T20 World Cup 2007) दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपवर ही सिरीज आधारित असणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra singh Dhoni) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) हा वर्ल्डकप जिंकला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकप जिंकण्याच्या 15 वर्षांनंतर चाहते वर्ल्डकपची विनिंग मोमेंट पुन्हा अनुभवू शकणार आहे. टी-20 वर्ल्डकपच्या विजयावर ही वेब-सिरीज तयार होतेय. मात्र निर्मात्यांनी अजून या बेव-सिरीजच्या टायटलचा खुलासा करण्यात आला नाहीये. या बेव-सिरीजमध्ये भारताने पाकिस्तानचा कसा पराभव केला होता आणि त्यानंतर वर्ल्डकपची ट्रॉफी की उचलली हे दाखवलं जाणार आहे.


युके प्रोडक्शन तयार करतंय सिरीज


या वेब-सिरीजची निर्मिती यूकेमधील प्रोडक्शन हाऊस वन वन सिक्स नेटवर्क करतंय. तर आनंद कुमार ही सिरीज दिग्दर्शित करणार आहेत. आनंद कुमार यांनी यापूर्वीही 'दिल्ली हाइट्स' तसंच 'जिला गाझियाबाद' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले होत. 


क्रिकेटवरील ही वेब-सिरीज 2023 मध्ये OTT प्लॅटफॉर्मवर विविध भाषांमध्ये रिलीज केली जाणार आहे. मुख्य म्हणजे या सिरीजनच्या काही भागाच शूटिंग आधीच पूर्ण झालंय. मात्र अजूनही याची अधिक माहिती समोर आलेली नाही. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर शेअर याबाबत माहिती दिली आहे.



T20 World Cup 2007 फायनल भारत विरूद्ध पाकिस्तानमध्ये खेळली गेली


टी20 वर्ल्डकप 2007 ची फायनल ही भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात खेळली गेली होती. टीम इंडियाने त्यावेळी 20 ओव्हर्समध्ये 157/5 अशा स्कोर केला होता. भारताकडून गौतम गंभीरने 54 बॉल्समध्ये 75 रन्स केले. त्यावेळी रोहित शर्मा यानेही 30 रन्सचं योगदान दिलं होतं.


धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला पहिला टी-20 वर्ल्डकप


महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्याच सत्रात हे विजेतेपद पटकावलं होतं. या क्षणाची इतिहासाच्या पानात नोंद झालीये.