मुंबई : तब्बल आठ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये वेस्ट इंडिजची टीम पाकिस्तानमध्ये टी20 सीरिज खेळणार आहे. वेस्ट इंडिजबरोबरच श्रीलंकेची टीमही पाकिस्तानमध्ये जाऊन खेळणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं आहे. याचबरोबर लाहोरमध्ये वर्ल्ड इलेव्हनची टीमही लाहोरमध्ये टी20 मॅचेस खेळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड इलेव्हनच्या या टीममध्ये हशीम अमला, फॅप डुप्लेसी, मॉर्नी मॉर्कल, इम्रान ताहीर आणि दोन ऑस्ट्रेलियाचे खेळाडू असतील अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी दिली आहे. तसंच वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंडचे खेळाडूही यामध्ये सहभागी होतील, असा विश्वास सेठींनी व्यक्त केला आहे.


नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमध्ये क्रिकेट होणार आहे. २००९ साली श्रीलंकेच्या टीमवर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं गेलं नव्हतं. २०१५ साली झिम्बाब्वेनं वनडे सीरिज खेळली होती.