मुंबई : भारताविरुद्धच्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी वेस्ट इंडिजने त्यांच्या टीमची घोषणा केली. यावेळी रहकीम कॉर्नवॉलच्या निवडीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. २६ वर्षांचा रहकीम कॉर्नवॉलची उंची ६ फूट ६ इंच आणि वजन १४० किलो एवढं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चमकादार कामगिरी केल्यामुळे कॉर्नवॉलची टेस्ट टीममध्ये निवड करण्यात आली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहकीम पहिल्यांदा इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात दिसला होता. ५५ प्रथम श्रेणी मॅचमध्ये कॉर्नवॉलने २४.४३ च्या सरासरीने २,२२४ रन केले आहेत. तर २३.६० च्या सरासरीने २६० विकेटही घेतल्या आहेत. या कामगिरीमुळे कॉर्नवॉलची भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड करण्यात आली. २०१७ साली भारताविरुद्धच्या सराव सामन्यात कॉर्नवॉलने ५ विकेट घेतल्या होत्या. यामध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या विकेटचा समावेश होता.



१४० किलो वजनाच्या रहकीम कॉर्नवॉलला भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर तो जगातला सगळ्यात वजनदार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचा विक्रम करू शकतो. १९०० च्या दशकात खेळलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वारविक आर्मस्ट्राँग यांच्यानावावर हे रेकॉर्ड आहे. आर्मस्ट्राँग यांचं वजन १३३ किलो एवढं होतं.



वेस्ट इंडिजची टेस्ट टीम


जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शमाराह ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, शेन डाऊरिच, शेनन गॅब्रियल, शिमरोन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच