मुंबई : क्रिकेटमध्ये केव्हा काय घडेल सांगता येत नाही. जो पर्यंत मॅचमधील अखेरचा बॉल टाकला जात नाही, तो पर्यंत कोणती टीम जिंकेल हे सांगणं जवळपास अशक्य असतं. असंच काहीसं वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधल्या पाचव्या वनडेवेळी घडलं. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधली वनडे सीरिज २-२नं बरोबरीत सुटली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वनडे सीरिजमधील ५ वी आणि अखेरची मॅच २ मार्च रोजी खेळली गेली. यावेळी वेस्ट इंडिजने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. बॅटिंग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा स्कोअर ५ बाद १११ असा होता. पण या स्कोअर मध्ये  फक्त २ रनची वाढ झाली आणि इंग्लंडची टीम ऑलआऊट झाली. म्हणजेच एकवेळ १११ वर ५ आऊट अशी स्थिती असलेल्या इंग्लंडची अवस्था सर्वबाद ११३ अशी झाली. या मॅच मध्ये ओशाने थॉमसने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. 


१११ वर पाच विकेट अशी परिस्थिती असताना मोईन अलीच्या रुपात इंग्लंडनं सहावी विकेट गमावली. यानंतर १११ स्कोअर असताना सातवी विकेट गेली. ११३ स्कोअरवर आठवी, नववी आणि दहावी विकेट इंग्लंडने गमावली.


११३ वर इंग्लंडचा डाव गुंडाळल्याने वेस्ट इंडिजला विजयासाठी अवघ्या ११४ रन्सचे माफक आव्हान मिळाले. हे आव्हान वेस्ट इंडिजने अवघ्या ३ विकेट गमावत १२.१ ओव्हर मध्ये पार केले. बॅटिंगसाठी आलेल्या क्रिस गेलने आक्रमक खेळ केला. त्याने अवघ्या २७ बॉलमध्ये ७७ रनची धडाकेदार खेळी केली. यात त्याने ९ सिक्स तर ५ फोर मारले. गेलने या खेळीसोबत या सीरिजमध्ये सर्वाधिक ३९ सिक्स लगावले. इतकेच नाही तर त्याने या सीरिजमध्ये १०६ च्या स्ट्राईक रेटने ४२४ रन्सचा रतीब घातला. यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.