दुसऱ्या टी-२०मध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकला
वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटनं टॉस जिंकला
लखनऊ : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारतीय टीमनं एक बदल केला आहे. उमेश यादवऐवजी भुवनेश्वर कुमारला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. लखनऊच्या मैदानामधली ही पहिलीच मॅच आहे. तसंच वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटनं धुक्याची शक्यता असल्यामुळे बॉलिंगचा निर्णय घेत असल्याचं सांगितलं. तर टॉस जिंकला असता तर आम्हीही बॉलिंगचाच निर्णय घेतला असता, अशी प्रतिक्रिया रोहित शर्मानं दिली.
भारताप्रमाणेच वेस्ट इंडिजच्या टीमनंही एक बदल केला आहे. पॉवेलऐवजी निकोलास पुरनला वेस्ट इंडिजनं संधी दिली आहे. पहिल्या टी-२०मध्ये वेस्ट इंडिजच्या टीमला २० ओव्हरमध्ये १०९ रनच करता आले होते. ११० रनचा पाठलाग करताना भारताची दमछाक झाली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या ५ विकेट गेल्या होत्या. ३ टी-२० मॅचच्या या सीरिजमधली दुसरी टी-२० जिंकून भारत सीरिज खिशात टाकण्यासाठी मैदानात उतरेल.
भारतीय टीम
रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, खलील अहमद