दुबई : T-20 विश्वचषक 2021च्या 24व्या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा संघ आमनेसामने येणार आहे. या दोघांमधील सामना दुबईत संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. पाकिस्तान विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. तर अफगाणिस्तानचा संघही पाकच्या विजयाची रथ रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान दोन्ही संघ 2019च्या वर्ल्डकपची घटना विसरून लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खानने 2019च्या विश्वचषकाची घटना आठवत दोन्ही टीमच्या चाहत्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.


29 जून 2019 रोजी लीड्समधील हेडिंगले मैदानावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यावेळी त्या भागात एक विमानही उडताना दिसलं, जे आकाशात 'जस्टिस फॉर बलुचिस्तान' बॅनर फडकवत होते. सामन्याच्या पहिल्या डावात झालेल्या मारामारीचे अनेक व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर अनेकांना मैदानाबाहेर काढण्यात आलं होतं. या दरम्यान एका चाहत्याने पाकिस्तानी गोलंदाज वहाब रियाझवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला.


'2019 मध्ये जे झालं ते आता संपलंय'


टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी रशीद म्हणाला की, 2019 वर्ल्डकपमध्ये जे काही घडलं ते होऊ नये. चाहत्यांना आवाहन करताना तो म्हणाला की, त्यावेळी जे काही झालं होतं ते आता संपलं आहे. हा सामना दोन्ही देशांमध्ये एकता आणेल आणि  एकत्र आणेल.