मुंबई : शुक्रवारी स्कॉटलंडचा मोठ्या फरकाने पराभव करून टीम इंडियाने पुन्हा एकदा उपांत्य फेरीच्या आशा उंचावल्या आहेत. 2021च्या T20 वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्ताननेही सामना जिंकला तर टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. असाच प्रश्न रवींद्र जडेजाला विचारला असता त्याने मजेशीर उत्तर दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यानंतर जेव्हा रवींद्र जडेजा टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेसाठी आला तेव्हा एका पत्रकाराने त्याला प्रश्न केला. येत्या सामन्यात अफगाणिस्तानला न्यूझीलंडचा पराभव करता आला नाही, तर पुढे काय? त्यावर रवींद्र जडेजाने थेट उत्तर दिलं की, मग बॅग भरू आणि घरी निघून जाऊ, दुसरं काय? 


लागोपाठ दोन मोठे विजय मिळवून टीम इंडियाने आपलं नेट-रनरेट जरी सुधारलं असलं तरी अद्यापही सेमीफायनलचा रस्ता सोपा नाही. टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर नामिबियालाही मोठ्या फरकाने पराभूत करावं लागणार आहे.



मुख्य म्हणजे अफगाणिस्तानला न्यूझीलंडवर विजय मिळवावा लागेल. अफगाणिस्तानच्या विजयामुळे ग्रुप-2 मध्ये असे तीन संघ असतील, ज्यांचे केवळ 6 गुण असतील. तरच नेट-रनरेटचा खेळ समोर येईल आणि त्याचवेळी टीम इंडियाला त्याचा फायदा मिळू शकेल.  


हा संघ भारताला उपांत्य फेरीत देणार प्रवेश


भारताचं रनरेट आता अफगाणिस्तानपेक्षाही चांगला झालंय. स्कॉटलंडवरील विजयामुळे भारताचा धावगती +1.619 वर गेलंय. पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानचं रन रेट देखील +1.065 आहे. रविवारी न्यूझीलंडशी सामना करणाऱ्या अफगाणिस्तानवर भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा आहेत. अफगाणिस्तानच्या विजयानंतर भारताला नामिबियाचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागला आहे. मात्र, न्यूझीलंडचा विजय भारताला स्पर्धेतून बाहेर काढेल.