दुबई : आज टी-20 वर्ल्डकपचा थरार संपणार आहे. न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यामधील एक टीम वर्ल्डकपवर हक्क गाजवणार आहे. कोण बाजी मारणार तसंच कोण वर्ल्डकप जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र आजची फायनलची मॅच ड्रॉ झाली तर? खासकरून न्यूझीलंडच्या टीमसाठी मॅच ड्रॉ झाली तर रिझल्ट काय असू शकतो हा प्रश्न आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वनडेच्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांची लढत होती. यावेळी फायनलचा सामना बरोबरीत सुटला होता. मात्र चौकारांच्या नियमावरून इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, आजचा सामना बरोबरीत सुटला किंवा ड्रॉ झाला तर नियम काय असतील आणि कोणाचा विजय होईल.


दुबईमध्ये रंगणारी टी-20 वर्ल्डकपची ही फायनल सुपर ओव्हरपर्यंत पोहोचली किंवा टाय झाली तर कोण विजयी टीम कशी घोषित होईल यासाठी आयसीसीने पहिलेच नियम स्पष्ट केलेत.


आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर पर्यंत हा सामना सुरु राहिल. आणि यामध्ये दोघांपैकी एखादी टीम विजयी होत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर सुरु ठेवण्यात येतील.


याचदरम्यान वातावरण किंवा इतर दुसऱ्या कारणाने सुपर ओव्हर होऊ शकली नाही किंवा सामना रद्द झाला तर अशा परिस्थितीसाठीही आयसीसी अगोदरपासूनच तयार आहे. 


जरी मॅचचा कोणताही रिझल्ट आला नाही तर अशात दोन्ही टीम्सना एकत्रित विजेते घोषित करण्यात येईल. त्याचप्रमाणे कोणत्याही इतर कारणाने सामनात आयोजित होऊ शकला नाही तर आयसीसीने रिझर्व डे ठेवला आहे.